रत्नागिरी नगरपालिकेचे अंदाजपत्रक अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षांसाठीचा २१० कोटी ८२ लाख जमा आणि २०३ कोटी खर्चाचे आणि ६ कोटी १० लाख शिलकीच्या अंदाजपत्रकाला पालिका प्रशासनाने मंजुरी दिली.

अंतिम मंजुरीसाठी ते जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवले आहे.

कोणतीही करवाढ नसणाऱ्या अंदाजपत्रकात पालिकेने उत्पन्नवाढीसाठी उतारे आणि दाखल्यांच्या शुल्कामध्ये काही प्रमाणात वाढ केली आहे. राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडी सार्वत्रिक निवडणुका लांबल्या आहेत. परिणामी, तीन वर्षे पालिकेचा कारभार प्रशासकाच्या ताब्यात आहे. त्यामुळे २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक प्रशासकांनी सादर केले आहे. त्यात प्रारंभीची शिल्लक २३ कोटी ४९ लाख ६३ हजार, महसुली जमा ५७ कोटी ८ लाख १५ हजार, भांडवली जमा १३० कोटी २५ लाख, एकूण जमा २१० कोटी ८२ लाख ७९ हजार, महसुली खर्च ७५ कोटी ८२ लाख ५८ हजार, भांडवली खर्च १२८ कोटी ७ लाख ८१ हजार तर एकूण खर्च २३० कोटी ९० लाख ३९ हजार आणि ६ कोटी ९२ लाख ३९ हजार शिल्लकी अंदाजपत्र सादर करण्यात आले.

पालिका प्रशासनाने हे अंदाजपत्रक मंजूर केले आहे. कोणतीही करवाढ नसली तरी गतवर्षीचे दायित्व मोठ्या प्रमाणात असल्याने त्याचा विकासकामांवर परिणाम दिसणार आहे. गेल्या वर्षी पालिकेने २१६ कोटी १३ लाख ८० हजार जमेचे तर १९२ कोटी ६४ लाख १६ हजार खर्चाचे असे २२ कोटी ४९ लाख ६३ हजार शिलकीचे अंदाजपत्रक मंजूर केले होते. घरपट्टी, पाणीपट्टी, करवसुलीवर आणि विविध विकासकामांनंतरही कोणतीही करवाढ नसणारे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. मंजूर झालेले हे अंदाजपत्रक अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 19-03-2025