चिपळूण : करंबवणे येथील युवकाचा अपघाती मृत्यू

चिपळूण : तालुक्यातील करंबवणे बौद्धवाडी येथील रसिक सिद्धार्थ पवार (२९) या तरुणाचा मोटारसायकल अपघातात जखमी झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दि. १४ मार्च रोजी रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान डेरवण येथील वालावलकर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

रसिक पवार हा ८ मार्च रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास भिले बस स्टॉप येथे चिंचेच्या झाडाजवळील तीव्र उताराच्या वळणावरून मोटारसायकलने जात असता मोटरसायकलवरील ताबा सुटल्याने गाडीसह तो गटारात पडला. यावेळी त्याच्या डोक्याला मार बसला. तत्काळ लाईफ केअर रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला अधिक उपचारासाठी वालावलकर रुग्णालय डेरवण येथे हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 19/Mar/2025