रत्नागिरी : चंपक मैदान येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यावर गुन्हा

रत्नागिरी : चंपक मैदानात सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार १७ मार्च रोजी रात्री ८.३० वा. सुमारास करण्यात आली. गोबरे चिनगुद भारती (३५, रा. एमआयडीसी मिरजोळे, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

तो सोमवारी रात्री आपल्याकडे दारू पिण्याचा परवाना नसताना सार्वजनिक ठिकाणी दारू पित असताना ही कारवाई करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 19/Mar/2025