आजचे राशीभविष्य, १९ मार्च २०२५

मेष

चंद्र आज 19 मार्च, 2025 बुधवारी तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सातवा भावात असेल. आजच्या दिवसाची सुरुवात आनंदात होईल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. दुपार नंतर नवीन कार्यारंभ करण्यात अडचणी येतील.

आपल्या कृती संयमित ठेवणे हितावह राहील. राग, द्वेष यांपासून दूर राहावे लागेल.

वृषभ

चंद्र आज 19 मार्च, 2025 बुधवारी तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सहावा भावात असेल. व्यापार – व्यवसायात यश प्राप्ती होईल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. आर्थिक लाभ संभवतात. प्रतिस्पर्ध्यांना चकवा देऊ शकाल. दुपार नंतर चांगले मनोरंजन होईल.

मिथुन

चंद्र आज 19 मार्च, 2025 बुधवारी तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून पाचवा भावात असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कामात अडचणी येतील. वाद होण्याची शक्यता असल्याने बौद्धिक चर्चेत आज सहभागी न होणे हितावह राहील. संतती विषयक काळजी निर्माण होईल. दुपार नंतर घरातील वातावरण शांत असल्याने मानसिक दृष्टया आपणास ताजेतवाने वाटेल.

कर्क

चंद्र आज 19 मार्च, 2025 बुधवारी तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून चवथा भावात असेल. आज काही ना काही कारणाने आपणास नैराश्य येईल. त्याचा आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होईल. शक्यतो आज प्रवास टाळावेत. स्थावर संपत्तीचा व्यवहार न करणे हितावह होईल. आईची तब्बेत बिघडू शकते.

सिंह

चंद्र आज 19 मार्च, 2025 बुधवारी तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून तिसरा भावात असेल. आज अचानकपणे प्रवास घडतील. नवीन कार्यारंभ कराल. परदेशातून लाभदायक बातमी मिळण्याची शक्यता आहे. फायदेशीर गुंतवणूक करू शकाल. दुपार नंतर अधिक भावनाशील व्हाल. मनात निराशेची भावना वाढू शकेल. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.

कन्या

चंद्र आज 19 मार्च, 2025 बुधवारी तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दुसरा भावात असेल. आज निर्णय घेण्यात त्रास होण्याची शक्यता असल्याने नवीन कामाची सुरवात आपण यशस्वीपणे करू शकणार नाही. आज मतभेद होण्याची शक्यता असल्याने शक्यतो मौन पाळावे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सामान्य राहील. दुपार नंतर वातावरण एकदम पालटेल. कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा करून योग्य ते निर्णय घेऊ शकाल.

तूळ

चंद्र आज 19 मार्च, 2025 बुधवारी तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून प्रथम भावात असेल. आज दिवसाच्या प्रारंभी आपले विचार दृढ व समतोल असतील. शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. नवी वस्त्रे व अलंकार ह्यावर जास्त खर्च होईल. दुपार नंतर आपली मानसिकता बदलेल. कुटुंबीयांशी मतभेद होतील.

वृश्चिक

चंद्र आज 19 मार्च, 2025 बुधवारी तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून बारावा भावात असेल. आज आपल्या मनाला शांतता लाभेल. मनात येणार्‍या नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवावे लागेल. कोर्ट- कचेरीच्या कामात सावध राहावे लागेल. शारीरिक स्वास्थ्य बिघडण्याची शकयता आहे. दुपार नंतर कार्यपूर्ती दृष्टिक्षेपात येईल.

धनु

चंद्र आज 19 मार्च, 2025 बुधवारी तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून लाभात भावात असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. प्राप्तीत वाढ संभवते. सामाजिक कार्यात सहभागी झाल्याने मन प्रसन्न होईल. मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल. व्यापारात लाभ संभवतो. अपघाताची शक्यता आहे. शारीरिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे.

मकर

चंद्र आज 19 मार्च, 2025 बुधवारी तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दशमात भावात असेल. आजचा दिवस स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी उत्तम आहे. व्यावसायिक क्षेत्रात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. बढती संभवते. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

कुंभ

चंद्र आज 19 मार्च, 2025 बुधवारी तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून भाग्यात भावात असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आपल्या वाणीवर संयम ठेवावा लागेल. संततीच्या आरोग्याची काळजी निर्माण होईल. दूरवरच्या प्रवासाची योजना आखू शकाल. दुपार नंतर व्यवसायातील वातावरण अनुकूल होईल.

मीन

चंद्र आज 19 मार्च, 2025 बुधवारी तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून अष्टमात भावात असेल. आज वाद होण्याची शक्यता असल्याने आपल्या वाणी व क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. गूढ विद्येचे आकर्षण होईल. सुखदायी बाबींत गोडी वाटेल. गहन चिंतन मनाला शांती देईल. दुपार नंतर अनुकूलता लाभेल. बौद्धिक दृष्टया लेखन कार्यात सहभागी व्हाल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 19-03-2025