मंडणगड : शहरात सुरु असलेल्या अनधिकृत विदेशी मद्य विक्रीवर कारवाई करावी, अशी मागणी मंडणगड शहरातील परवानाधारक मद्य विक्रेत्यांच्या संघटनेकडून करण्यात आली आहे. या विषया संदर्भात अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी यांना १० मार्च २०२५ रोजी दिलेल्या लेखी निवेदनात ही मागणी करण्यात आली. या निवेदनातील माहीतीनुसार मंडणगड शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर परजिल्हे व परराज्यातून अनधिकृत मद्य येत असून त्याची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. याचा परिणाम परवानाधारक मद्य विक्री केंद्रांवर दिसून येत आहे.
मंडणगड शहरापासून चोरट्या पध्दतीने तसेच काही बियर शॉपी मध्ये बियर व वाईन व्यतिरिक्त देशी, विदेशी व अन्य सर्व प्रकारच्या मद्याची विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. शहरापासून काही अंतरावर सुरु असलेल्या धाबे व हॉटेल्स परिसरात राजरोसपणे मद्य विक्री व बसून मद्य पिण्यास देत आहेत. यामुळे शासनाचा महसूल व उत्पादन शुल्क विभागाचा कर चुकवीला जात आहे.
अशा प्रकारच्या अवैध व्यवसायामुळे परवाना असलेले परमिट रुम धारकांच्या व्यवसायावर थेट परिणाम झाला आहे. आम्ही शासनाचे सर्व कर व महसूल भरत असून देखील आम्हांला व्यवसायामध्ये नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. तरी या सर्व बाबींचा आपणाकडून गांर्भीयाने विचार करुन त्यावर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवदेनावर अनुदिप्ती धारक भिंगळोली फॅमिली रेस्टॉरंट अँड बार, स्वागत हॉटेल बार अँड परमीट रुम, साई श्रध्दा बार ॲण्ड रेस्टॉरंट, श्रेया वार अँड रेस्टॉरंट, एस. के. कीचन बार अँण्ड रेस्टॉरंट धारकांच्या सह्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 AM 19/Mar/2025












