सावर्डे सहाण परिसरात स्वच्छता मोहीम

सावर्डे : गांधी तीर्थ स्वच्छता अभियान उपक्रमांतर्गत सावर्डे येथील निकम विद्यालयातील आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी श्रीदेव केदारनाथ मंदिर परिसराची स्वच्छता केली.

होळीच्या सणानिमित्त श्रीदेव केदारनाथाच्या मंदिर परिसरात मोठी यात्रा भरते. या यात्रेत परिसरातील हजारो लोक सहभागी होतात. त्याचबरोबर विविध दुकान मोठ्या प्रमाणावर या यात्रेत थाटलेली असतात. त्यामुळे प्लास्टिक कागद, रिकाम्या बाटल्या, ओला-सुका कचरा मोठ्या प्रमाणावर टाकला जातो. स्वच्छतेचे महत्त्व जाणून सावर्डे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत सहाण परिसरात स्वच्छता केली. कचऱ्याचे वर्गीकरण केले.

विद्यार्थ्यांमधील स्वच्छतेची भावना दृढ व्हावी, स्वच्छतेचे जीवनातील महत्त्व याची जाणीव होऊन त्याचा प्रचार प्रसार घरोघरी व्हावा, विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या उपजत कौशल्यांचा विकास व्हावा व श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व विद्यार्थ्यांना ज्ञात व्हावे, या उद्देशाने विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत स्वच्छता उपक्रम राबवल्याचे प्राचार्य राजेंद्र वारे यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 AM 19/Mar/2025