राज्य नाट्य स्पर्धेत ‘मीडिया’ प्रथम

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्यशासनाच्या ६३ व्या हौशी मराठी राज्य नाट्यस्पर्धा मुंबईतील रंगशारदा नाट्यमंदिर येथे झाली, स्पर्धेच्या या अंतिम फेरीत रुद्रेश्वर-गोवा या संस्थेच्या ‘मीडिया’ या नाटकासाठी सहा लाखांचे प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

या स्पर्धेच्या अंतिम फेरीत मराठवाडा मित्रमंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय, पुणे या संस्थेच्या ‘मून विदाउट स्काय’ या नाटकाला ४ लाखांचे द्वितीय पारितोषिक तर माणूस फाउंडेशन, मुंबई या संस्थेच्या ‘द फिलिंग पॅराडॉक्स’ या नाटकासाठी दोन लाखांचे तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.

अंतिम फेरीचे अन्य निकाल असे दिग्दर्शन गंगाराम नार्वेकर मीडिया), मुकुल डेकळे (मून विदाउट स्काय) डॉ. सोमनाच सोनवळकर (दी फिलिंग) पॅराडॉक्स), नेपथ्य सुमित शेलार (मून विदाउट स्काय), सचिन गोताड (दी फिलिंग पॅराडॉक्स), बोगेश कापडी (मीडिया). प्रकाशयोजना निखिल मारणे (मून विदाउट स्काय), प्रसन्न निकम (इन्शाअल्ला), साईप्रसाद शिकिर (दी फिलिंग पॅराडॉक्स), रंगभूषा एकनाथ नाईक (मीडिया), उल्लेश खंदारे (दी फिलिंग पॅराडॉक्स), उल्लेश खंदारे (लिअरने जगावं की मरावं). संगीत दिग्दर्शनः बिपिन वर्तक (इन्शाअल्ला), ऋषिकेश देशमाने (संगीत मतीविलय), कृष्णा देवा (डिनायल). उत्कृष्ट अभिनय : रौप्यपदक पुरुष अश्विन शर्मा (हमीदाबाईची कोठी), महेंद्र कुरघोडे (मोक्ष), यशवंत चोपडे (ब्लॅक्न्ड इक्वेशन), श्रीराम जोग (हा खेळ पुन्हा खेळू), प्रणव सपकाळे (मून विदाउट स्काय), डॉ. सोमनाथ सोनवळकर (दी फिलिंग पॅराडॉक्स), वैभव मावळे (बाघमाऱ्या जानकीराम), अमोल देशमुख (विक्रमाचा घातांक क्ष), महेश कोपरेकर (डिनायल), पंकज दिवेकर (इम्युनिटी दी व्हॉइस ऑफ टॉलरन्स), स्त्री कलाकार पुनम सरोदे (वेटलॉस), वैष्णवी काकोडे (मीडिया), भावना चौधरी (दी ब्लॅकन्ड इक्वेशन), समृद्धी कोटगी (इम्युनिटी दी व्हॉइस ऑफ टॉलरन्स), मानसी गोसावी (मून विदाउट स्काय), प्रेरणा खेडेकर (दी फिलिंग पॅराडॉक्स), लक्ष्मी पिंपळे (सेलिब्रिटी), अक्षता सुर्वे (इन्शाअल्ला), श्रेयसी वैदय (डिनायल), सिद्धी कुलकर्णी (वाघमाऱ्या जानकीराम).

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 AM 19/Mar/2025