गुहागर : गाडीवरील ताबा सुटून गाडी रस्त्याच्या बाजूला २० फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात चिरेखाण व्यावसायिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अभय अरविंद ओक (५२, मूळ रा. वेळंब, सध्या रा. आबलोली, गुहागर) असे कारचालकाचे नाव आहे. हा अपघात शुक्रवारी सकाळी कोतळूक येथे झाला.
अभय ओक यांचे चिरेखाण व्यवसायाबरोबर आबलोली येथे मेडिकल आहे. शुक्रवारी सकाळी ते बँकेचे काम करून आबलोलीवरून कोतळूक येथून कार (एमएच ०८ एपी ३७७७) ने घरी येत होते. कोतळूक कावणकरवाडी भागात ते आले असता त्यांचा गाडीवरील ताबा सुटला. त्यानंतर गाडी उजवीकडे रस्त्याखाली वीस फूट खाली दगडावर व झाडावर जाऊन आदळली. यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने चिपळूण येथील डेरवण येथे अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व मुले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 22-03-2025












