Gold Rate : सोन्याच्या दरात मोठी घसरण..

Gold Rate मुंबई : सोन्याच्या दरवाढीला अखेर ब्रेक लागला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. त्यामुळं सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ही दिलासादायक गोष्ट आहे.

एकीकडे शेअर बाजारात मोठी घसरण सुरु असल्यानं सोन्याच्या दरात वाढ सुरु होती. जानेवारीपासून सोन्याच्या दरात जवळपास 12 हजारांची वाढ झाल्याचं समोर आलं होतं. अखेर सोन्याच्या दरात आज मोठी घसरण झाली.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 10 ग्रॅम सोन्याचे दर 89796 रुपयांवर पोहोचले होते. मात्र, त्यानंतर गुंतवणूकदारांनी नफा कमावण्याचं धोरण स्वीकारल्यानं सोन्याच्या दरात 2000 रुपयांची घसरण एमसीएक्स वर पाहायला मिळाली. एमसीएक्सवर सोन्याचा दर 87785 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचला आहे. विशेष बाब 2025 मध्ये सोन्याच्या दरात 14 टक्के तेजी पाहायला मिळाली. तर, आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोन्याच्या दरात 15 टक्क्यांची वाढ झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:09 22-03-2025