गुगलने प्ले-स्टोअरमधून हटवले डेटा चोरणारे 331 ॲप्स

कॅलिफोर्निया – युजर्सच्या पर्सनल डेटाची चोरी करणारे ३३१ मोबाइल ॲप्स गुगलने प्ले स्टोअरवरून हटवले आहेत. हे ॲप्स आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी डाऊनलोड केले आहेत. सायबर गुन्हेगारांनी ‘व्हॅपर ऑपरेशन’ नामक मोहिमेअंतर्गत हे ॲप्स तयार केले होते.

दररोज याद्वारे २०० दशलक्ष बनावट जाहिरात रिक्वेस्ट पाठविल्या जात असत. आयएएस थ्रेट लॅबने अशा १८० ॲप्सचा छडा लावला होता. नंतर बिटडिफेंडरने आणखी ॲप्स शोधून काढले. हा आकडा ३३१ वर नेला. हे ॲप्स फिशिंग अटॅकच्या माध्यमातून युजर्सची लॉगिनविषयक पर्सनल माहिती चोरतात. क्रेडिट कार्डची माहिती यांच्या रडारवर असते.

कशी होते डेटाचोरी?

ॲप्स सिस्टम सेटिंगमध्ये खऱ्या ॲप्ससारखंच नाव घेऊन लपतात. बॅकग्राउंडला चालू असतातात. युजर इनपुटशिवाय स्वत:ला लाँच करतात. जाहिरात दाखवून अँड्ऱॉईडचं बॅक बटन डीॲक्टिव्हेट करतात. लोकप्रिय वेबसाइटसाठी नकली लॉगिन पेज दाखवून कार्ड डेटा व पासवर्ड चोरतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:13 22-03-2025