पाचल : राजापूर तालुक्यातील तळवडे आंबेवाडी येथे वणव्याने पर्शुराम गोपाळ गोसावी यांची काजूची बाग जळून खाक झाली. वणव्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या घटनेची माहिती मिळताच तळवडे गावच्या सरपंच गायत्री साळवी व पोलिसपाटील शितल कोटकर यांनी घटनास्थली भेट देऊन पाहाणी करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत करण्याची मागणी केली आहे.

हातातोंडाशी आलेली बाग जळून खाक झाल्याने त्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे, शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तळवडे आंबेवाडी सिध्दाचा माळ येथे गोसावी यांची सुमारे शंभरपेक्षा अधिक काजु कलमाची बाग होती. भरदुपारी लागलेल्या वणव्यामुळे ही संपूर्ण बाग जळून खाक झाली.
या घटनेची माहीती मिळताच काही ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र आग आटोक्यात न आल्याने क्षणार्धात बाग जळून खाक झाली. गोसावी हे काही कामानिमित्त मुबंईला गेले होते. त्यांना या घटनेची ही माहिती दुरध्वनीद्वारे देण्यात आली. ते गावी आल्यावर कृषी सहाय्यक, तलाठी व पोलिस पाटील यांना या घटनेची माहिती दिली. तलाठी, कृषी सहाय्यक व पोलिस पाटील यांनी घटनास्थळी येऊन नुकसानीची पाहाणी करून पंचयादी घातली आहे. मात्र, त्यांच्याकडून नुकसान किती झाले याची माहिती मिळू शकली नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 AM 25/Mar/2025














