ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू : चंद्रकांत झगडे

गुहगर : ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे ग्राहकांनी जागरुक असणे गरजेचे आहे. त्यासोबत पुरवठादारांनी देखील नैतिकदृष्ट्‌या पारदर्शकपणे व्यवसाय केला पाहिजे. ग्राहकाने आपले शोषण होण्यापासून मुक्त राहून अन्य ग्राहकांना जागरुक केले पाहिजे. आपला संघर्ष व्यक्तीबरोबर नसून अनुचित व्यापारी प्रथा, अनुचीत वृत्ती याविरोधात असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कोकण प्रांत अध्यक्ष चंद्रकांत झगडे यांनी केले.

गुहागर तहसील कार्यालय व अखिल भारतीय ग्राहक पंचायत गुहागर यांच्यावतीने आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिना कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष गणेश धनावडे, गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे, पुरवठा निरीक्षक समृद्धी पेंडसे, सहाय्यक महसूल अधिकारी शिंदे, जयवंत कदम आणि तहसील कर्मचारी अपर्णा गोयथळे, चैताली आरेकर, ऋणाली बागकर आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्याध्यापक कांबळे यांनीही मार्गदर्शन केले. ग्राहक दिनानिमित्त गुहागर तहसील कार्यालयाच्यावतीने ग्राहक जनजागृती, कर्तव्य व जबाबदारी या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. प्राथमिक गटात गार्गी क्षीरसागर, मयुरी कडव, वेद सुर्वे यांनी, तर माध्यमिक गटात उर्वी बागकर, कार्तिकी भोसले, अक्षरा रोहिलकर यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त केले, विजेत्यांना प्रमाणपत्र देवन गौरवण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 AM 25/Mar/2025