चिपळूण : तालुक्यातील महिला बचत गटांसाठी कार्यरत असलेल्या उमेद अभियानातील कंत्राटी अधिकारी, कर्मचारी यांना शासन सेवेत कायमस्वरूपी करावे, याप्रमुख मागणीसाठी उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कार्मचारी संघटना यांच्या वतीने शहरात भव्य रॅली काढण्यात आली. यामध्ये तालुक्यातील २ हजारांहून अधिक बचत गटांच्या महिला सहभागी झाल्या होत्या. या रॅलीचे रूपांतर पुढे मोर्चात झाले. या मोर्चानंतर या महिलांचे अधिवेशन घेण्यात आले.
‘उमेद’ अभियानाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात वेळोवेळी शासनस्तरावर झालेल्या बैठकीदरम्यान केवळ आश्वासने देण्यात आली. तरीही प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याने अभियानातील सर्व महिला, महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर २५ सप्टेंबरपासून अभियानातील कर्मचाऱ्यांच्या वतीने सांविधानिक मागनि आंदोलनाचा मार्ग स्विकारण्यात आला.
चिपळूण पंचायत समितीपासून प्रारंभ झालेल्या हा मोर्चा पुढे बसस्थानक, भोगाळे, चिंचनाका त्यानंतर सांस्कृतिक केंद्र परिसरातील छ. शिवाजी महाराज यांचा अभिवादन करुन हा मोर्चा पुढे मार्कंडी, काविळतळी त्यानंतर बहादुरशेख नाका ठिकाणी आला. त्या ठिकाणी असलेल्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयास अभिवादन केले. येथील पुष्कर सभागृह येथे या मोर्चाची सांगता होऊन बहादुरशेख नाका येथील सभागृहात अधिवेशन झाले. यावेळी मागण्यांसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 PM 07/Oct/2024