रत्नागिरी : शहरातील मुरुगवाडा झोपडपट्टी येथील वृध्दाचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना बुधवार २६ मार्च रोजी सकाळी ९.३० वा. सुमारास घडली. कादरसाब मेहबुबसाब नदाब (६९, रा. मुरुगवाडा झोपडपट्टी, रत्नागिरी) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे.
बुधवारी दुपारी ते आपल्या घरी खुर्चीवर बसलेले असताना त्यांना अचानक चक्कर येउन ते बेशुद्ध पडले. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना उपचारांसाठी खासगी वाहनाने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले असता, तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 AM 28/Mar/2025
