Disha Salian Case : वडिलांचं अफेअर.., दिशा सालियन केसमध्ये नवीन अँगल

Disha Salian Case : दिशा सालियान आरोप प्रत्यारोपांचा फैरी होत असतानाच आता आणखी एक माहिती समोर आली आहे. दिशा सालियानच्या मृत्यूवरून आरोप होत असतानाच आता दिशा सालियानने वडिलांच्या अफेअरमुळे संबंधितांना पैसा देऊन थकली होती.

कष्टानं कमावलेला पैसा नको त्या बाबींसाठी खर्च होत असल्याने दिशाने याबाबत मित्रांशी सुद्धा बोलणं केलं होतं. याच आर्थिक तणावातून दिशाने आत्महत्या केल्याचे मालवणी पोलिसांच्या तपासानंतर क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद केलं आहे. यापूर्वी झालेल्या शवविच्छेदन अहवालामध्येही दिशावर कोणत्याही प्रकारचा अत्याचार झाला नसल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आलं होतं. या अहवालात डोक्याला गंभीर इजा होऊन दिशाचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आलं आहे.

दिशा सालियान मृत्यू प्रकरणात नवा अँगल

दरम्यान, मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये आत्महत्याच केल्याचं नमूद करण्यात आलं आहे. दिशा सालियन आर्थिक बाबींमुळे अडचणीत होती. वडिलांच्या एका अफेअरमुळे दिशा त्यांना पैसे देऊन देऊन थकली होती. याबाबत दिशाने वडिलांच्या विवाहबाह्य सबंधांबद्दल मित्रांनाही सांगितलं होतं. या गोष्टींमुळेच तणावातून दिशाने आत्महत्या केल्याचा मालवणी पोलिसांचा निष्कर्ष आहे.

दिशा सालियनचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला

दिशा सालियनचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला होता. त्यानंतर तीन दिवसांनी तिचे पोस्टमॉर्टम झाल्याची नोंद आहे. त्यामध्ये दिशाच्या शरीरावर हाताला, पायाला, छातीवरही जखमा झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दिशाच्या डोक्यावर गंभीर जखम झाल्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. तसेच दिशाच्या नाकातून आणि तोंडातून देखील रक्त येत होतं, असं देखील रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. मात्र तिच्यावरती कुठलाही लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झालेला नाही असं रिपोर्टमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे.

ठाकरेंवर बेछूट आरोप करणाऱ्या निलेश ओझांचा वादग्रस्त इतिहास

दुसरीकडे, दिशा सालियान केस नव्याने वकील निलेश ओझा मांडत असून त्यांनी अत्यंत बेछूट पद्धतीने आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. मात्र, निलेश ओझा यांची पार्श्वभूमी अत्यंत वादग्रस्त आहे. न्यायसंस्थेवर भ्रष्ट्राचाराचे आरोप केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने 2020 मध्ये वकील निलेश ओझा यांना आर्थिक दंडासह तीन महिन्यांची शिक्षा सुनावली होती. याच प्रकरणात जनहीत याचिका करणाऱ्या राशिद खान पठाण यांनाही याच प्रकरणी ओझांसह शिक्षा झाली होती. काही प्रलंबित खटल्यांवरून हायकोर्टाच्या तत्कालीन न्यायमूर्तींविरोधात निलेश ओझा यांच्यासह काहींनी केले गंभीर आरोप केले होते. या घटनेची बार असोसिएशनसह, मुंबई उच्च न्यायालयानंही गंभीर दखल घेत कारवाई केली होती. 2020 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने न्यायिक व्यवस्थेतील भ्रष्टाचाराचा आरोप केल्याबद्दल वकील नीलेश ओझा यांना आर्थिक दंडासह तीन महिन्यांच्या शिक्षेचे आदेश दिले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 28-03-2025