रत्नागिरीतील ‘पाणी कपात’ लांबणीवर..

रत्नागिरी : रमजान ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोमवारीच साजरी होत असल्याने येत्या सोमवारपासून (३१ मार्च) पासून दर सोमवारी रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन स्थगित झाले आहे.

त्यामुळे आता कोणत्या तारखेच्या सोमवारपासून दर सोमवारी पाणीपुरवठा बंद ठेवायचा याबाबत यथावकाश निर्णय घेतला जाणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी अधिकारी यतिराज जाधव यांनी सांगितले.

रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात पावसाळा नियमित सुरु होईपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. परंतु उन्हाळ्यातील उष्णता वाढल्याने पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाणीसाठा कमी होण्याची भिती असते.

या पार्श्वभूमीवर पाण्याची कपात करण्याचे नियोजन झाले होते. गेल्या सोमवारपासून पुढील दर सोमवारी रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे निश्चित झाले होते. परंतु शिमगोत्सव आणि रमजानचे उपवास सुरु असल्याने हा निर्णयसुद्धा पुढे ढकलण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:54 PM 29/Mar/2025