रत्नागिरी : शहरातील तेली आळीनाका येथे भरधाव कारने दोन दुचाकी आणि एका रिक्षाला धडक देत अपघात केला.
अपघाताची ही घटना रविवार ३० मार्च रोजी दुपारी २.३० वा. सुमारास घडली. रविवारी दुपारी एक भरधाव वेगाने जाणारी रिट्झ कार मारुती मंदिर ते आठवडा बाजार अशी जात होती.
ती तेली आळी नाका येथे आली असता आपल्या पुढील दोन दुचाकी आणि त्यांच्या पुढील एका रिक्षाला या कारने पाठीमागून जोरदार धडक देत अपघात केला. या अपघातात दोन प्रवासी आणि रिक्षा चालक किरकोळ जखमी झाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 AM 31/Mar/2025














