सहाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी मुकेश खुल्लर यांची नियुक्ती

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निधीवाटपाचे सूत्र ठरविण्यासाठी नेमण्यात आलेल्या सहाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त सनदी अधिकारी मुकेश खुल्लर यांची नियुक्ती करण्यात आली.

नगरविकास विकास विभाग, ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांचे प्रधान सचिव आणि मुंबईतील इंदिरा गांधी विकास संशोधन संस्थेचे अर्थतज्ञ एस. चंद्रशेखर हे आयोगाचे सदस्य आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 PM 01/Apr/2025