रत्नागिरी : मारुती कॉमन क्लबच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त बोधचिन्हाचे अनावरण

रत्नागिरी : येथील खालची आळी येथील मारुती कॉमन क्लब या मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण करण्यात आले. गेली ४९ वर्षे सुरू असलेला माघी गणेशोत्सव हे मंडळाचे मुख्य आकर्षण असून यानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.

ज्या मारुतीच्या मंदिरावरून मंडळाची स्थापना झाली त्याच छोट्याशा मंदिरात मंडळातील बुजुर्ग व्यक्तिमत्त्व कुमारशेठ आगाशे व मंडळाचे माजी कार्यवाह एल्. एस्. जोशी यांच्या हस्ते व ज्येष्ठ सभासदांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष, कार्यवाह, खजिनदार सभासद व अन्य कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 02-04-2025