जाकादेवी : आमदार किरण सामंत यांच्या हस्ते नवीन बुद्धविहार बांधकामाचे भूमिपूजन

जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा ओरी आदर्श महिला मंडळ व बौद्धजन सेवा संघ ओरी मुंबई ग्रामस्थ यांच्या अंतर्गत जेतवन बुद्ध विहार पुनर्विकास समिती यांच्या माध्यमातून नव्याने उभारण्यात येणाऱ्या जेतवन बुद्ध विहार बांधणीचा कोनशीला (भूमीपूजन) समारंभ लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या हस्ते झाला.

कोनशिला भूमिपूजन समारंभप्रसंगी आमदार किरण सामंत यांच्या समवेत गटविकास अधिकारी जे.पी. जाधव, ओरी सरपंच स्वाती देसाई, उपसरपंच अनिल घवाळी, माजी सरपंच युवानेते संकेत देसाई, स्वागताध्यक्ष सिद्धार्थ जाधव, युवा नेतृत्व रोहित मयेकर, भारतीय बौद्ध महासभा ओरीचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद, मुंबई कमिटीचे कार्यकर्ते, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बुद्ध विहाराला विनामूल्य जमीन देणारे गणपत जाधव व त्यांचे कुटुंबीय यांचा आमदार भैया सामंत यांच्याहस्ते जाहीर सत्कार करण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 AM 02/Apr/2025