कोकण विभागाची मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत उल्लेखनीय कामगिरी

ठाणे : आर्थिक वर्ष 2024-25 साठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत कोकण विभागातील पाच जिल्ह्यांसाठी डीआयसी एजन्सी – 2 हजार 802 (101.52%) आणि (डीआयसी+केव्हीआयबी)- 3 हजार 273 चे 100% एकूण लक्ष्य यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.

यामध्ये रत्नागिरी (151.46%), रायगड (104.5%), सिंधुदुर्ग (125.83%), पालघर (101%) या चार जिल्ह्यांसाठी 100% पेक्षा जास्त लक्ष्य साध्य केले आहे. इतर जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त कामगिरीद्वारे ठाणे (54.03%) क्षेत्राची तूट भरून काढली आहे.

कोकण विभाग (डीआयसी), रत्नागिरी (जिल्हा), सिंधुदुर्ग (डीआयसी), पालघर (डीआयसी) ने सलग दोन वर्षे 100% लक्ष्य साध्य केले असून रायगड जिल्ह्याने पहिल्यांदाच 100% डीआयसी लक्ष्य साध्य करून इतिहास रचला आहे. तसेच, रत्नागिरीने महाराष्ट्रात सर्वाधिक एमएम दावे (83%) सादर केले आहेत आणि महाराष्ट्रात एमएम वितरणात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

या कामगिरीकरिता कोकण विभाग उद्योग सहसंचालक कार्यालय, सर्व महाव्यवस्थापक, सर्व उद्योग अधिकारी/उद्योग निरीक्षक, सर्व एलडीएम आणि सर्व बँक अधिकारी, सर्व 5 जिल्ह्यांचे एमसीईडी/मिटकॉन अधिकारी आणि त्यांच्या टीमचे 100% पेक्षा जास्त लक्ष्य साध्य केल्याबद्दल तसेच, 54% लक्ष्य साध्य केल्याबद्दल ठाणे जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक श्रीमती सोनाली देवरे, व्यवस्थापक, उद्योग निरीक्षक आणि त्यांच्या टीमचे कोकण विभागाच्या उद्योग सहसंचालक विजू शिरसाठ यांनी अभिनंदन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:41 02-04-2025