रत्नागिरी : सध्या समाजात आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. रत्नागिरी जिल्हाही याला अपवाद नसून जिल्ह्यात गेल्या ६ वर्षांत तब्बल १ हजार १५५ जणांनी आपली जीवनयात्रा संपवली. यामध्ये ३०० महिला तर ८५५ पुरुषांचा समावेश आहे.
स्वतःच स्वतःचे आयुष्य संपवण्याचे कृत्य म्हणजे आत्महत्या होय. ज्या वेळी एखाद्या व्यक्तीला आपले जीवन निरर्थक किंवा नौरस वाटते तेव्हा त्याच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येतात. ‘आयुष्यात अपयश आले म्हणजे आता आपण जगण्यास लायक राहिलो नाही’ हा विचार अनेक लोकांना आत्महत्येच्या कृतीकडे नेतो. यामागे अनेक कारणे असू शकतात. जीवनामध्ये सतत येणार अपयश, आर्थिक संकटे, नातेसंबंधांतील गुंतागुंत अशी आत्महत्येमागील कारणे असण्याची शक्यता असते.
काही वेळेस मानसिक आजारांमुळेही आत्महत्या करण्याचे विचार मनामध्ये येत असतात. मानसिक त्रास, असहाय्यता संपवण्याच्या उद्देशाने लोक आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. आकडेवारीनुसार, जगभरात दर वर्षी सुमारे १० लाख लोक मृत्यूच्या कारणांच्या क्रमवारीमध्ये आत्महत्या हे तेराव्या क्रमांकावरचे कारण आहे. आत्महत्या ही समाजदृष्टीने निंद्य मानली आहे. अशा आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांना कायद्याने शिक्षाही होते.
आत्महत्या करायचा प्रयत्न करतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, मानवी आईवडील, सासूसासरे यांच्याशी आणि पतिपत्नींत भांडण झाल्यामुळे आत्महत्या करणाऱ्यांत स्त्रिया आणि त्याही १८ ते ३० वर्षांच्या वयोगटातील अधिक आहेत. इतर जिल्ह्यातील आत्महत्येचे प्रमाण कारणांमध्ये दारिद्रय, परीक्षेत अपयश आणि वेड ही प्रमुख कारणे आहेत. आत्महत्येच्या पद्धतींमध्ये पाण्यात उडी मारुन जीव देणे, गळफास लावून घेणे आणि विषारी औषध प्राशन, रेल्वेखाली उडी घेणे या मुख्य पध्दती आहेत.
परिस्थितीशी सामना करावा
प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. त्यामुळे खचून न जाता त्याचा सामना करुन त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा. आलेली वाईट वेळ निघून जाते त्यामुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये. असे रत्नागिरी पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.
काय करायला हवं..?
स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या पातळीवर या विषयी आपण अनेक गोष्टी करू शकतो. सतत निराश वाटणे, झोप न येणे अथवा जास्त झोप येणे, भूक कमी होणे, सारखी चिडचिड होणे, अस्वस्थता राहणे, टोकाचे विचार येणे अशी लक्षणे आपल्याला स्वतःला किवा आपल्या जवळच्या व्यक्तीमध्ये दिसून आल्यास आपण तज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे. तरूणाईच्या आयुष्यात सध्याच्या कालखंडात करियर आणि प्रेम-आकर्षण या मधील गोंधळामधून निर्माण होणारे प्रश्न हे मानसिक अस्वास्थ्य आणि आत्महत्येशी खूप जवळून संबंधित असल्याचे आपल्याला दिसून येते. याविषयी कुटुंबात मोकळेपणाने बोलण्याचे वातावरण निर्माण करण्यातून अनेक प्रश्नांची तीव्रता कमी होऊ शकते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:47 PM 05/Apr/2025
