रत्नागिरी : जिल्ह्यातील ९८ विहिरींमधील होणार गाळ उपसा

रत्नागिरी : जिल्ह्यात गाळाने भरलेल्या ९८ विहिरींमधील गाळ उपसा करण्यात येणार आहे. या विहिरींचा गाळ उपसा झाल्यास जिल्ह्यात उद्भवणारा पाणी टंचाईचा मोठा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे संभाव्य पाणी टंचाई कृती आराखड्यामध्ये या विहिरींवर ९० लाख ७० हजार रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

जिल्ह्यातील जमीन जांभा दगडाची असल्याने पावसाचे प्रमाण जास्त असतानाही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. जिल्ह्यात सध्या अनेक गावांमधील ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या टंचाईच्या कालावधीत विहिरींचा ग्रामीण भागातील ग्रामस्थांना फायदा होतो.

जिल्ह्यातील विहिरींमधील गेली अनेक वर्षे गाळ काढण्यात आलेला नाही. त्यामुळे या विहिरींमधील झरे बंद झाले आहेत. भविष्यात या विहिरी गाळाने बुजण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यासाठी या विहिरीतील गाळ काढणे आवश्यक आहे. या विहिरींच्या कामांना शासनाने मंजुरी दिली असून, ही कामे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे विहिरींमध्ये पाणीसाठा मुबलक होण्यास मदत होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:53 PM 09/Apr/2025