खेड : तालुक्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील वेरळ येथे नवीन हुंडाई ओरा मोटारवर पत्र्याचे दुकान कोसळल्याने गाडीचे लाखोंचे नुकसान झाले. तर पाच दुकान गाळ्यांचे पत्रे उडून गेले आहेत. या नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.
खेड तालुक्यातील खोपी फाटा परिसरात मंगळवारी सायंकाळी अवकाळी पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्याने नुकसान झाले. यावेळी सदैव आणि जीवितहानी झाली नसली तरी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा मोठा फटका खेडमध्ये बसला आहे.
रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावरील खेड मधील खोपी फाटा या ठिकाणी महामार्ग लगत असणारे पाच दुकान गाळे वादळी वाऱ्यामुळे अक्षरशः पत्त्यासारखे कोसळले. यावेळी कोणीही प्रवासी आसपास नसल्याने जीवितहानी झाली नाही मात्र त्या गाळ्यांसमोर उभी करून ठेवलेली हुंदाईओरा मोटारीचे मोठे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी गेले दोन दिवस तुरळक अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. शासनाने अवकाळी व वादळात झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 AM 04/Apr/2025
