आयपीएल 2025 चा हंगाम 22 मार्चपासून सुरु झाला आहे. आतापर्यंत 15 सामने खेळवण्यात आले आहे.
आयपीएल 2025 च्या हंगामातील 15 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनराझर्स हैदराबाद यांच्यात खेळवण्यात आला.
या सामन्यात कोलकाताने 80 धावांनी विजय मिळवला. या कोलकाताच्या या विजयानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत बदल झाला आहे. सध्या आयपीएलच्या गुणतालिकेत पंजाब किंग्स अव्वल क्रमांकावर आहे. पंजाब किंग्सने 4 गुण आहेत.
आयपीएलच्या गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्सचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. दिल्लीचेही 4 गुण आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 3 सामन्यात 2 विजयासह तिसऱ्या स्थानावर आहे. बंगळुरुचे एकूण 4 गुण आहेत.
गुजरात टायटन्सचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. गुजरातचे 4 गुण आहेत.
कोलकाता नाईट रायडर्सही 4 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ 2 गुणांसह सध्या सहाव्या क्रमांकावर आहे.
लखनौ सुपर जायट्सही 2 गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे.
चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत एका सामन्यात विजय मिळवला आहे. चेन्नईचा संघ 2 गुणांसह आठव्या स्थानावर आहे.
राजस्थान रॉयल्सचा संघ 2 गुणांसह नवव्या क्रमांकावर आहे.
आयपीएल 2025 च्या हंगामात पहिल्याच सामन्यात धुमाकूळ घालणारा आणि आयपीएलमध्ये 300 धावा करण्याची ताकद आहे, अशी ओळख असणारा सनरायझर्स हैदराबाद सध्या गुणतालिकेत दहाव्या स्थानावर आहे. हैदराबादचे 2 गुण आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 04-04-2025
