राजापूर : कोंढेतडसाठी १५ लाखांचा निधी मंजूर

राजापूर : राजापूर नगर परिषद कार्यक्षेत्रातील कोंढेतड येथील श्री देव चव्हाटा कपाऊंड अंतर्गत सुशोभीकरण करणे कामी शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत १५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या अंतर्गत संरक्षण भिंत, कमानी, बैठक व्यवस्था, आवश्यकतेनुसार छप्पर, बगीचा आदी कामे केली जाणार आहेत.

या कामी भाजपाचे युवा मोर्चा अध्यक्ष व कोंढेतड ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अरविंद लांजेकर यांनी माजी आमदार प्रमोद जठार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. याबाबत ग्रामस्थांतून माजी आ. जठार, आ. किरण सामंत यांना धन्यवाद दिले जात आहेत. श्री देव चव्हाटा, श्री गांगो देव हे कोंढेतडवासीयांचे ग्राम दैवत असून श्री देव चव्हाटा मांड येथे दरवर्षी शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून निधी मंजूर झाल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 AM 04/Apr/2025