मेष – आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. नवे कार्य करण्याची प्रेरणा मिळून त्याचा आरंभ सुद्धा कराल. शीघ्र गतीने विचारात बदल होऊन मनाची अवस्था द्विधा होईल. आज नोकरी – व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल.
वृषभ – आपली अनिर्णायकी अवस्था झाल्याने हाती आलेली सोनेरी संधी आज आपण गमावून बसाल. मनात वैचारिक गोंधळ उडाल्याने आज आपण कोणताही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही.
मिथुन – आज दिवसाची सुरुवात प्रफुल्लित मन व स्वस्थ चित्ताने होईल. मित्र व नातलगांसह सहभोजनाचा आनंद लुटाल. सुंदर वस्त्रे परिधान कराल. आर्थिक दृष्टया आजचा दिवस लाभदायी आहे.
कर्क – आज मानसिक अस्वस्थता जाणवेल. त्यामुळे आपण कोणताही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. संबंधितांचे गैरसमज झाल्याने आपण व्यथित व्हाल. कौटुंबिक बाबींवर खर्च होईल. शक्यतो वाद टाळावेत.
सिंह – आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. तरीही द्विधा मनःस्थितीमुळे हातची संधी जाण्याची शक्यता आहे. मनात विचारांचे काहूर माजेल. द्विधा मनःस्थितीमुळे नवे कार्य हाती न घेणे हितावह राहील.
कन्या – आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नवीन कार्यात यशस्वी होऊ शकाल. व्यापारी व नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरीत पदोन्नती संभवते. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल.
तूळ – आज आपण बौद्धिक व लेखन कार्यात व्यस्त राहाल. आजचा दिवस नवीन कार्यारंभास शुभ फलदायी आहे. एखादा दूरचा प्रवास घडण्याची शक्यता आहे. व्यापार – व्यवसायात मोठा फायदा संभवतो.
वृश्चिक – आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. शक्यतो आज नवीन कार्याची सुरुवात करु नये. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अवैध कृत्या पासून दूर राहणे हितावह राहील. हातून एखादा राजद्रोह घडण्याची शक्यता आहे.
धनु – आजचा दिवस आनंददायी व समाधान मिळवून देणारा आहे. मनोरंजन, मेजवानी, सहल, प्रवास, मित्र व प्रिय व्यक्तीचा सहवास तसेच सुंदर वस्त्र लाभ हि आजच्या दिवसाचे वैशिष्ठय असेल.
मकर – आजचा दिवस व्यापार – व्यवसायातील प्रगती व आर्थिक नियोजन यासाठी अनुकूल आहे. वसुली तसेच आर्थिक देवाण- घेवाणीत यश मिळेल. आयात – निर्यातीचा व्यापार करणार्यांना फायदा होईल.
कुंभ – आजचा दिवस मानसिक अशांतता व उद्विग्नता यांनी भरलेला आहे. सातत्याने विचार बदलत राहतील त्यामुळे निर्णायकता असणार नाही. ठोस निर्णय घेऊ शकणार नाही.
मीन – आज दक्षता बाळगण्याची गरज आहे. कुटुंबीयांशी मतभेद होतील. आईची प्रकृती हा चिंतेचा विषय होईल. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. मानसिक उद्वेग, धनहानी व मानहानी होईल.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 05-04-2025













