रत्नागिरी : पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेतून महिलांसाठी येत्या सोमवारी रत्नागिरीत गद्रे मरीन एक्स्पोर्टमध्ये रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने जिल्ह्यातील रोजगार इच्छुक महिला उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिने २०० हून अधिक महिला दहावी पास / नापास, बारावी पास पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन येत्या सोमवारी दि.
७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता, गद्रे मरीन एक्स्पोर्टमध्ये करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील सर्व उमेदवारांनी रोजगार संधीचा लाभ घेण्यासाठी त्यांची नोंदणी www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर करावी. नोंदणीकृत सर्व उमेदवारांनी त्यांचे प्रोफाइल अद्ययावत करावे. नोंदणी केलल्या उमेदवारांनी त्यांच्याकडील युझर आयडी व पासवर्डच्या साह्याने ७ एप्रिलच्या पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावामध्ये ऑनलाइन अर्ज करून रोजगार मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीकरिता त्यांचा बायोडाटा व इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतींसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे.रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपली नोंदणी नसल्यास कार्यालयाकडे त्वरित संपर्क साधून नोंदणी करावी आणि रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 05-04-2025














