आजचे राशीभविष्य, ७ एप्रिल २०२५

मेष – आज आपले मन अधिक संवेदनशील बनेल. त्यामुळे कोणाचे बोलणे किंवा वागणे यामुळे मनाला दुःख होईल. मानसिक भीती बरोबर शारीरिक अस्वस्थतेमुळे आपण बेचैन व्हाल. आईचे स्वास्थ्य खराब असेल.

वृषभ – आज चिंतेपासून मुक्तता मिळाल्याने आपण स्फूर्ती व उत्साह अनुभवाल. हळवेपणा व काल्पनिकता यांच्या जगात वावराल. आपल्या अंतर्गत कला व साहित्य बाहेर येण्यास आजचा दिवस अनुकूल आहे.

मिथुन – आज काम होण्यास वेळ लागला तरी प्रयत्न चालू ठेवणे हितावह राहील. कामे नक्की पूर्ण होतील. आर्थिक योजनात सुरुवातीला काही अडचणी येतील पण नंतर मार्ग मोकळा होताना दिसेल.

कर्क – आजचा दिवस सर्व दृष्टीने आनंददायी आहे. शारीरिक व मानसिक दृष्टया स्वस्थ व आनंदी राहाल. आप्तेष्ट व कुटुंबीयां कडून सौख्य व आनंद ह्यांची प्राप्ती होईल. तसेच त्यांच्या कडून काही भेटवस्तू मिळतील.

सिंह – आज आपण अती भावनाशील व्हाल. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. दलाली, चर्चा व वाद ह्या पासून दूर राहणे हितावह राहील. कोर्ट – कचेरीच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल.

कन्या – आजचा दिवस लाभदायी आहे. विविध पातळ्यांवर यश, कीर्ति व लाभ होतील. धन प्राप्ती होईल. मित्र – मैत्रिणीं कडून काही लाभ संभवतात. प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे मन आनंदित होईल.

तूळ – आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात व कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. नोकरीत बढतीची संधी लाभेल. कौटुंबिक जीवनात आनंद व उत्साहाचे वातावरण असेल.

वृश्चिक – आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज नोकरी – व्यवसायाच्या ठिकाणी सावधपणे कामे करावी लागतील. वरिष्ठांच्या नकारात्मक धोरणाने तुम्हाला त्रास होऊ शकतो.

धनु – आज आपणास खूप सावध राहावे लागेल. कोणतेही नवीन काम आज सुरू न करणे आपल्या हिताचे राहील. आत्यंतिक संवेदनशीलतेमुळे मनःस्थिती दुःखी होईल. पाण्या पासून सावध राहावे लागेल.

मकर – विविध कारणांनी आपल्या व्यापाराचे विस्तृतीकरण होऊन त्यात वाढ होईल. दलाली, कमिशन, व्याज इत्यादी मार्गांनी उत्पन्नात वाढ होईल. धन लाभ संभवतो.

कुंभ – आजचा दिवस आनंददायी आहे. कामात यश तसेच कीर्ती मिळेल. कुटुंबियांसह दिवस चांगला जाईल. नोकरी – व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल.

मीन – आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपण काल्पनिक जगात रमून जाल. विद्यार्थ्यांना आपली हुशारी दाखविता येईल.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 07-04-2025