चिपळूण : मिरजोळी गावातील वीजखांब व विद्युत रोहित्रांवर आलेल्या वेलींची आता साफसफाई सुरू करण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वी आवश्यक कामे केली जाणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मिरजोळी गावात मोठमोठे उद्योग आहेत. तरीही विविध कारणांमुळे सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थांसह उद्योजकांमध्ये नाराजी आहे. गावाला वीजपुरवठा करण्यासाठी गुहागर मार्गावर असलेल्या मुख्य वीजवाहिन्यांवर साखरवाडीपासून फैसलबागेपर्यंत वेलींचे साम्राज्य होते. महावितरणने साफसफाईच्या कामाला सुरवात केली आहे. पावसाळ्यापूर्वी आवश्यक ती सर्व कामे पूर्ण केली जाणार आहेत.
गावात कार्यरत असलेले वायरमन चांगले काम करत असून, त्यांनी वीजपुरवठा सातत्याने खंडित होऊ नये किंवा एखाद्या भागातील काम करताना संपूर्ण गावाचा वीजपुरवठा खंडित करावा लागू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कार्यालयाकडून करून घेतल्याची माहिती महावितरणचे सहाय्यक अभियंता अर्जुनकुमार मोहिते यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 AM 08/Apr/2025














