मेष – आज कुटुंबियांशी मतभेद झाल्याने मन उद्विग्न होईल. छातीतील दुखणे किंवा इतर आजारामुळे चिंतातुर व्हाल. आर्थिक खर्चात वाढ होईल. प्रवासात त्रास होण्याची शक्यता आहे.
वृषभ – आज आपण जे काम हाती घ्याल त्यात यशस्वी व्हाल.
विरोधकांवर मात करू शकाल. सामाजिक क्षेत्रात मान – सन्मान संभवतात. दुपार नंतर मात्र संघर्षमय वातावरणास सामोरे जावे लागेल.
मिथुन – आज मनातील नकारात्मक विचार काढून टाकावे लागतील.मनात असंतोष वाढेल. कौटुंबिक वातावरण गढूळ होईल. शारीरिक स्वास्थ्य पण मिळणार नाही. वाचन- लेखनात विद्यार्थ्यांचे मन लागणार नाही. दुपार नंतर मात्र मन प्रसन्न राहील. तरीही नवीन कार्याचा आरंभ करण्याचे धाडस करू नका.
कर्क – आज आपण भावनेच्या भरात वाहून जाल. जवळपासच्या प्रवासाची शक्यता आहे. आज आरोग्य चांगले राहील व मन ताजेतवाने राहील. दुपार नंतर मात्र मनात निराशेची भावना येऊन ते बेचैन होईल.
सिंह – आज आपण कोणताही महत्वाचा निर्णय घेण्याच्या मनःस्थितीत नसाल. तेव्हा महत्त्वाचा निर्णय घेणे आज टाळावे. कौटुंबिक कार्यासाठी पैसा खर्च होईल. गैरसमज व मतभेद होण्याची शक्यता असल्याने वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल.
कन्या – आज अनेक प्रकारचे लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात फायदा होईल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल. दुपार नंतर मात्र एखाद्या व्यक्तीशी मतभेद होतील. संतापाच्या भरात कोणाशी वाद होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागेल.
तूळ – आज कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल. घरातील व्यक्तींशी प्रेमाने वागाल. गृहसजावटीत बदल कराल. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य वाढेल. उच्च अधिकार्यांमुळे व्यवसायात आर्थिक लाभ होतील. आर्थिक नियोजन निष्ठापूर्वक कराल.
वृश्चिक – आज नशिबाची साथ लाभेल. परदेशस्थ स्नेह्यांकडून चांगल्या बातम्या येतील. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. एखादा प्रवास संभवतो. धनलाभ सुद्धा संभवतो. नोकरीत पदोन्नती संभवते. आपले प्रत्येक काम यशस्वीपणे पूर्ण होऊ शकेल. मातेशी सौहार्दता राहील.
धनु – आज सकाळी आपणास प्रकृतीचा त्रास जाणवेल. नकारात्मक विचारांचा प्रतिकूल परिणाम मनःस्वास्थ्यावर होईल. सबब वैचारिक स्तरावर संयम बाळगावा लागेल. आर्थिक चणचण भासेल. दुपार नंतर मात्र शारीरिक व मानसिक स्वास्थ्यात सुधारणा होईल. अचानक धन प्राप्ती संभवते. . व्यवसायात लाभ होईल.
मकर – आज कुटुंबीयांसह प्रवासाचा आनंद लुटाल. दुपार नंतर मात्र मन व्याकुळ होईल. अधिक खर्च झाल्याने आर्थिक चणचण भासेल.
कुंभ – आजचा आपला दिवस सुखाचा व शांततेचा आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण असेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. वाहनसौख्य मिळेल. व्यावसायिक क्षेत्रात कीर्ती होईल. वस्त्र व अलंकार ह्यासाठी पैसा खर्च होईल.
मीन – आज वाद होण्याची शक्यता असल्याने शक्यतो बौद्धिक चर्चा टाळा. नवीन कार्यात अडचणी येतील. दुपार नंतर परिस्थितीत एकदम बदल होईल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभल्याने समाधान होईल.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 08-04-2025














