रत्नागिरी : ग्राहकाला एकाच ठिकाणी, अनेक वस्तू, योग्य दरात मिळण्यासाठी कन्झ्युमर्स शॉपी हे गृहोपयोगी व गृहसजावटींच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री पटवर्धन हायस्कूलच्या मैदानावर येत्या १० ते १४ एप्रिलदरम्यान आयोजित केले आहे.
या प्रदर्शनात भारतातील अनेक नामांकित कंपन्यांचा सहभाग आहे. या मोठ्या कंपन्यांबरोबरच महिला व लघुउद्योजकही मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत.
पाच दिवसांच्या या कन्झ्युमर्स शॉपी प्रदर्शनात हॅन्डीक्राफ्ट, ज्वेलरी, साडी, लेदर पर्सेस, लेडीज गार्मेंट, लखनवी फुलकारी, गाऊन्स, टॉप्स, फुड प्रॉडक्टस्, पापड, हेल्थ केअर प्रॉडक्ट, चहा, सौंदर्यप्रसाधने, वॉटर प्युरिफायर, नॉनस्टिक कुकवेअर, ओव्हन्स, सुईंग मशिन, मिक्सर, फुड प्रोसेसर आहेत. अगरबत्ती, कार्पेटस, बेडशीटस, लहान मुलांचे कपडे, फर्निचर, स्टेनस्टिलच्या किचनमध्ये लागणाऱ्या वस्तू व डिशेस उपलब्ध आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:42 08-04-2025












