दापोली : आवास योजनेंतर्गत ३ हजार ३०७ घरकुलांना मंजुरी

दापोली : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तालुक्यात ३ हजार ३०७ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. यातील काही घरांच्या बांधकामाचा प्रारंभही करण्यात आला आहे. सर्वसामान्यांना पक्की घरे मिळावी, यासाठी केंद्र, राज्य शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ग्रामीण भागातील जनतेला पक्की घरे बांधून दिली जात आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:07 PM 08/Apr/2025

Shanti 3