मेष– मित्र-स्वकीयांकडून भेटवस्तू मिळतील. त्यांच्या सहवासात वेळ आनंदात जाईल. तसेच त्यांच्यासह एखादा समारंभ किंवा सहलीस जाऊ शकाल.
वृषभ- वाचन – लेखन ह्या सारख्या साहित्य प्रकारात अभिरुची वाढेल.
कष्टाच्या मानाने यश कमी मिळत असले तरी सुद्धा आपली कामातील तत्परता प्रगतीस सहाय्यक होईल.
मिथुन– निद्रानाश झाल्याने प्रकृती बिघडेल. शक्यतो प्रवास टाळा. पाणी व द्रव पदार्थ घातक ठरतील. जमीन, मिळकत यावर आज चर्चा करू नका.
कर्क– कामातील यश व प्रिय व्यक्तीचा सहवास ह्यामुळे आपण आनंदी राहाल. आर्थिक लाभ संभवतो. नशिबाची साथ लाभेल. लहान सहलीस जाऊ शकाल. मान – सन्मान वाढतील.
सिंह– आपल्या प्रभावी संभाषणाने लोकांचे लक्ष वेधून घ्याल. प्राप्ती पेक्षा खर्च जास्त होईल. उत्कृष्ट भोजन मिळेल. नियोजित कामात यश जरा कमीच मिळेल.
कन्या– उत्तम भोजन, भेटवस्तू, वस्त्र इत्यादींची प्राप्ती होईल. मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. आनंदाची प्राप्ती, जोडीदाराचा सहवास व प्रवास ह्यात आपला दिवस आनंदात जाईल.
तूळ– सगे सोयरे यांच्याशी पटणार नाही. मनोरंजन तसेच फिरण्यात पैसे खर्च होतील. भिन्नलिंगी आकर्षण प्रबळ होईल. मानसिक व्यग्रता कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
वृश्चिक– मंगलकार्ये ठरतील. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. नोकरी-व्यवसायात उत्पन्न वाढेल. स्त्री वर्गाकडून लाभ होईल. वडीलधार्यांच्या सहकार्यामुळे प्रगती करू शकाल.
धनु– मैत्रिणींकडून लाभ होईल. नोकरीत वरिष्ठ अधिकारी आपल्या बढतीचा विचार करतील. गृहजीवनात आनंद व समाधान मिळेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळेल.
मकर– शारीरिक अस्वास्थ्य व थकवा जाणवेल. संततीची समस्या चिंता वाढवील. दूरचे प्रवास घडतील. विरोधक, प्रतिस्पर्धी यांच्याशी चर्चा तसेच अनावश्यक खर्चापासून दूर राहा.
कुंभ– राग व बोलण्यावर संयम ठेवा. आर्थिक चणचण जाणवेल. खूप विचार केल्याने मानसिक थकवा जाणवेल. आपल्या मनावरचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा लागेल.
मीन- सिनेमा, नाटक किंवा बाहेर भोजन करणे असा एखादा कार्यक्रम आखाल. कलावंत किंवा कारागीरांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 12-04-2025














