रत्नागिरी : येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ३. कार्यालयाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केलेल्या ६ हजार १५२ दोषी वाहनांवर नी कारवाई करून २ कोटी ६० लाख ७३ हजार रुपयांचा दंड वसूल केला. या मोबाईलवर संभाषण करत वाहन चालवणाऱ्या ३६८ जणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
आरटीओ कार्यालयाच्या वायूवेग पथकामार्फत नियमितपणे वाहनांची तपासणी केली जाते आणि तपासणीदरम्यान दोषीवर नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाते. या कार्यालयामार्फत २०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण ६ हजार १५२ दोषी वाहनांवर कारवाई करून २ कोटी ६० लाख ७३ हजार रुपयांचा दंड तसेच ७७ कोटी ३६ हजार रुपये कर वसूल केला आहे. वाहतूक नियम मोडणाऱ्या ४९ स्कूलबसवरही कारवाई केली आहे.
सर्वाधिक दंड वसुली मालवाहू ट्रक, टिप्पर, ट्रेलर आदी वाहनांकडून केली आहे. ३९५ ओव्हरलोड वाहनांकडून १ कोटी ११ लाख १५ हजार, तर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या तसेच वाहतुकीचे नियमभंग करणाऱ्या ३१७ प्रवासी बस, रिक्षा यांच्याकडून ३० लाख २५ हजार इतकी दंड वसुली करण्यात आलेली आहे. ४९ दोषी स्कूलबस वाहनांवरही कारवाई करण्यात आली आहे तसेच विनाहेल्मेट १ हजार ७५१ प्रकरणे, ट्रीपल सीट १९७, मोबाईलवर बोलणे-३६८ प्रकरणे, तर ओव्हरस्पीडची १ हजार १७३ प्रकरणांमध्ये दंडात्मक कारवाई करण्यात आली.
सुरक्षेसाठी नियमांचे पालन करा
रस्ते अपघात टाळण्यासाठी तसेच रस्ता सुरक्षेसाठी सर्व नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर यापुढेही करडी नजर राहणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 AM 12/Apr/2025












