दापोली : तालुक्यातील कर्दे येथील घराशेजारी असलेल्या विहिरीत पडलेल्या दोन कोल्ह्याना वनविभाग पथकाने सुखरूपरित्या बाहेर काढून जीवदान देत नैसर्गिक अधिवासात सोडले.
कर्दे मोहल्ला येथील शबाना मुकादम यांच्या घरानजीक विहिरीत दोन कोल्हे पडल्याचे निदर्शनास आले. या बाबत दापोली वनविभागाला कळवल्यानंतर त्यांच्या बचाव पथकामार्फत विहिरीमध्ये उतरून कोल्ह्याना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यांना कोणतीही इजा झालेली नाही, यी खात्री करून नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
ही कार्यवाही दापोली परिक्षेत्र वनअधिकारी प्रकाश पाटील यांया मार्गदर्शनाखाली वनपाल आर. डी. खोत, वनरक्षक विश्वाभर झाडे, सुरज जगताप, एस. डी. गुरव, एस. भिलारे, किरण घोरपडे यांया पथकाने केली. दरम्यान, लहान मुले, वन्यजीव, पाळीव जनावरे पडून जीवितहानी होऊ नये, यासाठी वैयक्तीक, सार्वजनिक विहीर, आड यांना लोखंडी जाळी बसवून घेण्याबाबत वनविभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:47 PM 12/Apr/2025












