रत्नागिरी : जिल्ह्यातील ५२ विंधन विहिरींची होणार दुरुस्ती

रत्नागिरी : एप्रिल आणि मे महिन्यात प्रचंड उकाड्याच्या दिवसात बाष्पीभवनामुळे जलसाठा कमी होतो. त्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर होऊ नये, त्याने पाणीटंचाईची झळ बसू नये, म्हणून २४ गावांतील जलस्रोतांचे आधार असलेल्या ५२ विंधन विहिरींची दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी ३१ लाख २० हजार रुपये खर्च मंजूर करण्यात आला आहे.

जिल्ह्यात ३५७ गावांत पाणीटंचाईची झळ बसण्याची शक्यता आहे. एप्रिल आणि मे महिन्यात तापमान मोठ्या प्रमाणात अधिक वाढते. सध्याचे तापमान ३३ अंशांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा मोठा परिणाम जलसाठ्यांवर होत आहे. जिल्ह्यातील मोठे मध्यम व लघु प्रकल्पातील जलसाठे आटले आहेत. त्यामुळे पाणीटंचाईची झळ मार्च महिन्याच्या पंधरवड्यानंतर
बसू लागली आहे.

टंचाईवर मात करण्यासाठी ज्या काही उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत, त्यात विंधन विहिरींची दुरुस्तीची कामे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून केली जाणार आहेत. त्यामुळे टंचाईग्रस्तांना त्याचा मोठा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:45 PM 15/Apr/2025