संगमेश्वर : बँकेच्या कर्मचारीवर्गाकरिता आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात क्रिकेट स्पर्धेपासून झाली असून, या स्पर्धा सावंत अॅकॅडमी क्रिकेट क्रीडांगण कोळंबे (रत्नागिरी) येथे पार पडल्या. त्यामध्ये नऊ तालुके आणि प्रधान कार्यालय रत्नागिरी असे एकूण १० संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये संगमेश्वर किंग्ज संघाने विजेतेपद पटकाविले.
या स्पर्धेत पहिल्या सामन्यात संगमेश्वर किंग्ज संघाने गुहागर तालुक्यावर १८ धावांनी मात केली. त्यामध्ये सामनावीर समीर गराटे ठरला. तत्पूर्वी उपांत्यफेरीत खेड संघावर ६४ धावांनी मात करत संगमेश्वर संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. उपांत्यफेरीत प्रतीक चव्हाण सामनावीर ठरला. अंतिम सामन्यात प्रधान कार्यालयांवर ६७ धावा करताना ५ विकेट राखून मात केली.
अंतिम सामन्यात सामनावीर म्हणून समीर गराटे ठरला. त्याला मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांच्या हस्ते गौरवण्यात आले. संगमेश्वर किंग संघामध्ये तुषार साळुंके, प्रतीक चव्हाण, समीर गराटे, संदेश पदेरे, महेश कांबळे, सुरेंद्र झेपले, सूरज पवार, स्वप्नील कुवळेकर, मिथिल शिंदे, अभिजित घाणेकर, विशाल धनावडे, तुषार आंब्रे, विजय सोळंकी, दिलीप मोहिते खेळाडू सहभागी होते. तसेच रवींद्र रजपूत हे प्रशिक्षकाच्या भूमिकेत होते. संपूर्ण स्पर्धेला बँक कर्मचाऱ्यांसह, क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
कर्मचाऱ्यांना विरंगुळा
बँक कर्मचारीवर्गाला रोजच्या कामाचा ताण यामधून थोडा विरंगुळा मिळावा म्हणून बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांनी हा उपक्रम मागील तीन वर्षांपूर्वी सुरू केला आहे. त्यामाध्यमातून बँक कर्मचाऱ्यांच्या उत्साहात भर पडू लागली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 AM 19/Apr/2025














