आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदी मंगळवारी (17 सप्टेंबर) 74 वर्षांचे झाले.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या संदेशात मेलोनी यांनी इटली आणि भारत यांच्यातील मैत्रीचे संबंध अधिक मजबूत व्हावेत आणि ते अधिक विस्तारित व्हावेत असं म्हणत जागतिक आव्हानांना एकत्रितपणे तोंड देण्याची परस्पर वचनबद्धता दर्शविली.

मोदींचा 74 वा वाढदिवस

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी (17 सप्टेंबर) 74 वर्षांचे झाले. नरेंद्र दामोदरदास मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील मेहसाणा या छोट्याशा गावात झाला. भारतातील सर्वात प्रभावशाली राजकीय नेत्यांपैकी एक नेते अशी त्यांची ओळख आहे. नरेंद्र मोदी हे सामान्य कुटुंबात जन्मलेले आणि आपल्या कामाने असमान्य बनलेले व्यक्तिमत्व आहे.

सन 2001 ते 2014 असे सलग तीन वेळा त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम केलं. मोदींचा कार्यकाळ महत्त्वपूर्ण आर्थिक विकास आणि प्रशासन सुधारणांनी भरलेला होता. 2014 मध्ये पहिल्यांदा ते देशाचे पंतप्रधान झाले. आता त्याचा पंतप्रधानपदाचा तिसरा कार्यकाळ सुरू आहे.

भाजपकडून सेवा पखवाडा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस भाजपकडून सामाजिक योगदानासह साजरा करण्यात येत आहे. भाजपने ‘सेवा पखवाडा’ उपक्रम सुरू केला आहे जो 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीला संपेल. पंधरवडा चालणाऱ्या या मोहिमेसाठी पक्षाने राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यीय समिती स्थापन केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:56 18-09-2024