मंडणगड : गोपीनाथ मुंडे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय ई-परिषदेचे आयोजन

मंडणगड : येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथ मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षांतर्गत रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र विभागाच्यावतीने २८ व २९ एप्रिल रोजी ऑनलाईन, आभासी पध्दतीने ‘शाश्वत विकासासाठी रासायनिक आणि भौतिक विज्ञानातील समतोल’ या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून युएई विद्यापीठ, युएई येथील प्रा. डॉ. जफर सईद हे उपस्थित राहणार आहेत, तर कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी अध्यक्ष म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व भारत सरकारच्या विमुक्त, भटक्या व अर्धभटक्या जमाती विकास व कल्याण मंडळाचे माजी अध्यक्ष पद्मश्री कर्मवीर दादा इदाते हे उपस्थित राहणार आहेत.

परिषदेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा संपदा पारकर यांच्याहस्ते होणार आहे तर डॉ. अकवर इनामदार, डॉ. रवींद्र बुलाखे (दक्षिण कोरिया), डॉ. शिवाजी मारकड (युएसए), प्रा. डॉ. नंदकिशोर चंदन, डॉ. अनिल पालवे, डॉ. रमेश देवकाते, डॉ. भीमराव खाडे हे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या आंतरराष्ट्रीय ई-परिषदेत रासायनिक आणि भौतिक विज्ञानातील विविध विषयांतील शिक्षणतज्ज्ञ तसेच नवोदित शास्त्रज्ञ, संशोधक विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी या ई-परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेस उपस्थित राहाण्याचे आवाहन प्रचार्य डॉ. राहुल जाधव व उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांनी केले आहे. परिषद यशस्वी होण्यासाठी डॉ. सूरज बुलाखे, सहसंयोजक प्रा. संदीप निर्वाण, आयोजन सचिव डॉ. मुकेश कदम, समन्वयक प्रा. शरिफ काझी, डॉ. भरतकुमार सोलापुरे, डॉ. महेश कुलकर्णी, ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप हे प्रयत्न करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 AM 23/Apr/2025