आंजणारी घाटात केमिकल वाहतूक करणारा टँकर पलटी

लांजा : मुंबईहून कणकवलीच्या दिशेने जाणारा आणि केमिकल वाहतूक करणारा टँकर मुंबई गोवा महामार्गावर आंजणारी घाटात पलटी झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. त्यानंतर या टँकरने समोरून येणाऱ्या टाटा पंच कारला धडक दिल्याने दोन्ही वाहनांचे नुकसान झाले हा अपघात मंगळवारी 22 एप्रिल रोजी सायंकाळी 5.15 वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत अधिक माहिती अशी की, वकील गुलाम अहमद (वय 22, राहणार धदारपुर, वाराणसी, राज्य उत्तर प्रदेश) हा आपल्या ताब्यातील टँकर क्रमांक (MH 43 Y 3417) एलडीओ केमिकल घेऊन मुंबई ते कणकवली असा जात होता.

हा टँकर आंजनारी पूल येथे सायंकाळी 5:15 वाजता आला असता चालकाचे नियंत्रण सुटले व टँकर महामार्गावर पलटी झाला. याच दरम्यान लांजाहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या टाटा पंच कारला (क्रमांक MH 47 BT 0124) ठोकर दिली. सदर कार निलेश प्रकाश विलनणकर (वय 47 वर्ष, राहणार खडपे वठार, रत्नागिरी) हे चालवत होते. ते लांजावरून रत्नागिरी येथे जात होते. या अपघातानंतर मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात टँकर मधील केमिकल सांडले होते.

त्यामुळे केमिकलचा दुर्गंध सर्वत्र पसरला होता. मात्र वाहतुकीस कोणत्याही प्रकारचा अडथळा झाला नाही वाहतूक सुरू होती. अपघाताची माहिती मिळतात लांजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपकेंद्र हातखंबाचे एपीआय विक्रम पाटील, सहाय्यक पोलीस फौजदार मारुती हलगे, हवालदार उमेश जाधव, हवालदार बाजीराव निरटे, हवालदार कुलदीप दाभाडे, चालक रिलेश कांबळे यांच्यासह लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा पोलीस ठाण्याचे सहा. पो. फौजदार भालचंद्र रेवणे, पो. हेड कॉन्स्टेबल पो. हेड कॉन्स्टेबल सचिन भुजबळराव, पो. कॉन्स्टेबल नितेश राणे हे घटनास्थळी दाखल झाले.

सायंकाळी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त टैंकर बाजूला करण्यात आला. तर टँकर ड्रायव्हरला दुखापत झाल्याने त्याला पाली येथे शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:22 PM 23/Apr/2025