संगमेश्वर : देवरूख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन, चित्रकला महाविद्यालय, रत्नागिरीतील प्रद्योत आर्ट गॅलरी आणि ओम साई मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथील ओम साई मित्रमंडळ येथे होणार आहे.
स्पर्धेची वेळ सकाळी ९:३० ते दुपारी १२:३० पर्यंत असून, दुपारी बक्षीस समारंभ होणार आहे. ही स्पर्धा पाचवी ते सातवी व खुला गट अशी होणार आहे. प्रत्येक गटामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आणि उत्तेजनार्थची २ पारितोषिके दिली जाणार आहेत. अधिक माहितीसाठी कलाशिक्षक अवधूत पोटफोडे, सिद्धांत चव्हाण, मयुरी घाणेकर भाटकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:54 PM 25/Apr/2025












