गुहागर : तालुक्यातील कुंभवणे-आरेगाव या मार्गावर गेले अनेक दिवस मोऱ्यांचे काम सुरू असल्याने गुहागर आगारातून या मार्गावरील बससेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना व विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते किंवा खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो.
यात वेळ व जास्त पैसा वाया जातो. त्यामुळे या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी समाजसेवक पराग कांबळे यांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 AM 26/Apr/2025













