लांजा : मुंबईच्या दिशेने जाणारी कार थेट काजळी नदीपत्रात कोसळल्याची घटना शुक्रवारी २५ एप्रिल रोजी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास आंजणारी पुल येथे घडली आहे.
मुंबईच्या दिशेने जाणारी ही आहे कार लांजा तालुक्याच्या हद्दीत आंजणारी पूल येथे आली असता समोरून आलेल्या आणि गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात गाडी चालकाने हुल दिल्याने कार चालकाचा अंदाज चुकला आणि ही कार थेट पुलावरून काजळी नदीपात्रात कोसळली. या घटनेत कारचालक हा बालमबाल बचावला आहे.
मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे. दैव बलवत्तर म्हणूनच कार अपघातून चालक बालमबाल बचावला आहे. सायंकाळी ५.४५ वाजता हा अपघात घडला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 AM 26/Apr/2025













