Breaking : रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथे एटीएस ची मोठी कारवाई 

रत्नागिरी : जिल्ह्यातील सावर्डे येथे दहशदवाद विरोधी पथकाकडून मोठी कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सावर्डे येथून ६ जणाना ताब्यात घेतले आहे. यामध्ये कर्नाटक येथील पाच जणांचा समावेश आहे. अतिरेकी संघटनांना पैसे पुरवल्याचा आरोप या संशयितांवर आहे. आज सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळतेय.