भाटीमिऱ्या येथे वृद्धेचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी : शहरातील भाटीमिऱ्या येथील वृध्देचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना सोमवार २८ एप्रिल रोजी दुपारी ३ वा. सुमारास जिल्हा शासकिय रुग्णालयात घडली. मनीषा मारुती जोशी (६९, रा. भाटीमिऱ्या, रत्नागिरी) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या वृध्देचे नाव आहे.

त्या सोमवार २८ एप्रिल रोजी मुलगी सेजल चव्हाण हिच्या भाटिमिऱ्या येथील घरी रहाण्यासाठी गेली होती. दुपारचे जेवण झाल्यानंतर त्या बेडवर बसलेल्या असताना त्यांना अचानकपणे अस्वस्थ वाटून श्वास घेण्यास त्रास होउ लागला. ही बाब त्यांच्या मुलीच्या लक्षात येताच तिने नातेवाईक आणि शेजाऱ्यांच्या मदतीने आईला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी मनीषा जोशी यांना तपासून मृत घोषित केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:46 AM 30/Apr/2025