खेड रेल्वे स्थानक सुशोभीकरण कामाचे लोकार्पण

खेड : खेड रेल्वे स्थानक परिसर सुशोभीकरणाच्या कामाचा लोकार्पण सोहळा बुधवारी ऑनलाईन पद्धतीने सकाळी साडेनऊ वाजता सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी खेड रेल्वे स्थानकासमोर ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रम पाहण्यासाठी भाजपाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, माजी आमदार सूर्यकांत दळवी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकां चव्हाण, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, भाजपचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, शहराध्यक्ष अनिकेत कानडे यांच्यासह खेड, दापोली, मंडणगड येथील पदाधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्या सौ जटाळ, निलेश पावसे आदी उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम विभागांनी खेड रेल्वे स्थानक तसेच वेरळ, भोसते, कोंडीवली, शिव या गावांना जोडणाऱ्या काँक्रिटीकरण, रुंदीकरण व सुशोभीकरण कार्यक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन झाले. यावेळी माजी आमदार सूर्यकांत दळवी, भाजपा जिल्हाद्यक्ष केदार साठे यांच्या हस्ते नाम फलकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 10-10-2024