राजापूर : पाचलबाबतचा ‘तो’ अहवाल दिशाभूल करणारा – नीलेश चांदे

राजापूर : स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय निर्मितीसाठी शासनाने केवळ रायपाटणचा अहवाल मागितलेला असतानाही महसूल प्रशासनाकडून रायपाटणसोबत पाचलचाही अहवाल सादर केला आहे. पाचलबाबतचा अहवाल दिशाभूल करणारा आहे. तो पाठवू नये, अशी मागणी रायपाटणचे सरपंच नीलेश चांदे यांनी केली.

पाचलबाबतचा अहवाल शासनाने तत्काळ न थांबविल्यास महाराष्ट्र दिनी (ता. १) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करू, असा इशारा त्यांनी दिला. याबाबतचे निवेदन सरपंच चांदे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले आहे.

तसेच त्याच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी यांनाही पाठवल्या आहेत. शासन निर्णयानुसार, रायपाटण ग्रामपंचायतीने सर्व प्रथम मार्च २००० मध्ये रायपाटण येथे अप्पर तहसीलदार कार्यालय व्हावे म्हणून शासनाकडे मागणी केली होती; परंतु या कालावधीत कोविडचा प्रादुर्भाव झाल्याने ही मागणी मागे पडली.

त्यानंतर, पुन्हा सप्टेंबर २०२३ मध्ये महाराष्ट्र शासनाकडे रायपाटण ग्रामपंचायतीने अप्पर तहसीलदार कार्यालयाची मागणी केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 AM 30/Apr/2025