धाराशिव : राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी किशोर व किशोरी आणि अस्मिता खेलो इंडिया महिला लीग स्पर्धेसाठी किशोरी असे तीन संघ महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी धाराशिव येथे जाहीर केले.
धाराशिवची सिद्धी भोसले व सांगलीचा श्री दळवी यांची झारखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तर छत्रपती संभाजीनगरच्या वैष्णवी भावले हिची वडोदरा (गुजरात) येथे होणाऱ्या अस्मिता खेलो इंडिया महिला लीग स्पर्धेसाठी कर्णधारपदी निवड केली आहे. खेलो इंडिया स्पर्धेसाठी रत्नागिरीच्या वैष्णवी फुटक हीची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
हे संघ निवडण्यासाठी धाराशिव जिल्हा खो- खो संघटनेच्या वतीने मैदान निवड चाचणी धाराशिव येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मैदानावर झाली. त्यातून अमोल मुटकुळे (हिंगोली), विशाल पाटील (जळगाव), राजाराम शितोळे (सोलापूर) व वर्षा कछवा (बीड) या निवड समिती सदस्यांनी हे संघ निवडले. त्यानंतर हे संघ डॉ. जाधव यांनी जाहीर केले. या संघास महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अॅड. गोविंद शर्मा यांनी शुभेच्छा दिल्या. झारखंड येथे २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत होणाऱ्या ३४ व्या किशोर व किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत आणि २८ ते २९ सप्टेंबर २०२४ या कालावधीत वडोदरा (गुजरात) येथे होणाऱ्या अस्मिता खेलो इंडिया महिला लीग किशोरी गट स्पर्धेत हे संघ सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्राचे संघ असे : राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा – किशोर गट : भिमसिंग वसावे (धाराशिव), विनायक बनगे (ठाणे), प्रथमेश कुंभार, प्रसाद बळीप (सातारा), श्री दळवी (सांगली), सुरेश वसावे, प्रफुल्ल वसावे (धाराशिव),सुयश चव्हाण, सचिन थोरात (पुणे), मयूर जाधव (सातारा), संस्कार वाळवे (सांगली), निलेश गवळी (नाशिक),श्रावण राऊत (सोलापूर),हिमांशू ठाकरे (छ. संभाजीनगर), अथर्व खरड (अहमदनगर), राखीव :श्रेयस शिंदे(मुं. उपनगर), अमन गुप्ता (ठाणे), सार्थक हिरेकुर्ब (सांगली), प्रशिक्षक : विकास सूर्यवंशी (छ. संभाजी नगर), सहाय्यक प्रशिक्षक : विकास परदेशी (अहमदनगर), व्यवस्थापक : राम चोखट (परभणी).
किशोरी गट : सिद्धी भोसले (धाराशिव), वेदिका तामखडे (सांगली),गौरी जाधव (सातारा), कोमल पासले (सोलापूर), ईश्वरी सुतार , राही पाटील, मुग्धा सातपुते (धाराशिव), श्रावणी तामखडे, पायल तामखडे (सांगली), अपर्णा वर्दे, ज्ञानेश्वरी इंगळे (पुणे), प्रणिती जगदाळे (ठाणे), प्राजक्ता बोरसे, पल्लवी सहारे (नाशिक), कादंबरी तेरवणकर (मुंबई). राखीव : भवरम्मा ऊटगी (सांगली), सलोनी गांगुर्डे (धाराशिव), श्रेया करे (पुणे), प्रशिक्षक : अतुल जाधव (सोलापूर), सहाय्यक प्रशिक्षक मयूर परमाळे (पुणे), व्यवस्थापिका : रोहिणी आवारे (धाराशिव).
अस्मिता खेलो इंडिया महिला लीग – किशोरी गट : ऋतुजा सुरवसे, कीर्ती काटे (सोलापूर), आरोही पाटील (धाराशिव), कार्तिकी फारणे (सांगली). आरती घाटे (पुणे), गौरी रोडे, निधी जाधव (ठाणे), प्रांजल जाधव, दिशा बोंद्रे (सातारा), नीलम मोहंडकर (नाशिक), वैष्णवी फुटक (रत्नागिरी), रोहिणी गावित (नंदुरबार), वैष्णवी भावले (छ. संभाजीनगर), वैष्णवी मदन (जालना), राणी भालेराव (परभणी). प्रशिक्षक : महेंद्रकुमार गाढवे (सातारा), व्यवस्थापक : नंदिनी धुमाळ (मुंबई).
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:28 18-09-2024