रत्नागिरी : जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर, संगमेश्वरमधील साखरपा भाग या दक्षिण रत्नागिरीतील विविध गावे, वाड्या, वस्त्यांमधील दळणवळण अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये तब्बल १७३ कोटी ११ लाखांच्या निधीमधून ८१ पुलांची कामे हाती घेण्यात आली आहेत.
त्यापैकी काही पूर्ण झाली आहेत, तर काही प्रगतिपथावर असल्याचे उत्तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओठवणेकर यांनी सांगितले. ग्रामीण जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली यात विशेष लक्ष घातले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (उत्तर) ही कामे पुर्ण झाल्यास दक्षिण रत्नागिरीतील सह्याद्रीच्या दळणवळणाच्यादृष्टीने पट्ट्यातील सुधारण्यास मदत होणार आहे.
ग्रामीण भागातील अनेक गावे, वाड्या, वस्त्या रस्ते, साकव, पूल नसल्याने संपर्कात नाहीत. त्यामुळे अशा गावांचा पायाभुत विकास खोळंबतो. आरोग्य, शैक्षणिक विकास खुंटतो. उत्तर विभागात सुरू असलेल्या ८१ पुलांमुळे संपर्कात नसणारी गावं, वाड्या विकासाच्या प्रवाहात येणार आहेत. ग्रामीण भागात नदी, ओढयांवर पुल नसल्याने काही गावांचा संपर्क नसतात किंवा तेथील ग्रामस्थांना दळणवळणाच्यादृष्टीने वळसा मारावा लागतो. आता सह्याद्रीच्या पट्ट्यातील हा प्रश्न सुटणार आहे. सर्व गाव, बाड्या, वस्त्या पुलांची काम पूर्ण झाल्यास विकासाच्या प्रवाहात येऊन समृद्धीच्यादृष्टीने वाटचाल करतील.
रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे वांद्री रस्त्यावरील पुल बांधण्यात येत आहे. साखरप्यातील भडकंबा भोवडे येथील राम मंदिर व हनुमान मंदिर येथील मोठे पुल, राजापूरातील भालावली ते अळवाची फांदी या राज्य मार्गावील पुल, देवरुखातील हरपुरे बेलारी कुंडी ते जिल्हा सिमेपर्यतच्या रस्त्यावरील कॉजवे, रत्नागिरी तालुक्यातील ओरी धामणसे नेवरे रस्त्यावरील लहान पुल, मिरजोळे वांद्री रस्त्यावरील कमकुवत झालेल्या पुलाची पुर्नबांधणी, आगवे कुरतडे चांदराई रस्त्यावरील पुल, लांजा तालुक्यातील बेवली कोर्ले प्रभानवल्ली खोरनिनको विशाळगड रस्त्यावरील पुलाचे बांधकाम, राजापूरातील व्हेळ रिंगणे पाचल पुलाचे काम, तसेच मूर कार्जीडा पुल, सौंदळ तुळसवडे, ताम्हाणे रस्त्यावरील पुल, अशी अनेक राजापूर तालुक्यातील पुलांचा समावेश आहे.
संगमेश्वर तालुक्यातील पोचरी परचुरी कुरधुंडाआधी भागासाठी लहान पूल, मारळ निवघे गळवाडी धनगरवाडी रस्त्यावरील फूल, आरवली मुरडव कुंभारखाणी कुचांबेतील पुलाची पुर्नबांधणी. रत्नागिरी तालुक्यातील चाफे निवेंडी मालगुंड पुलाचे काम, उंडी रिळ बरबडे पुलाचे काम, हरचेरी देवध रस्त्यावरील पुल अशा प्रकारे रत्नागिरी, राजापूर, लांजा, साखरपा, देवरुख भागातील ८१ पुलांचा यामध्ये समावेश आहे. यासाठी १७३ कोटी ११ लाखाच्या निधी खर्च केला जाणार असल्याचे अमोल ओटवणेकर यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:55 PM 01/May/2025














